समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल - अँड.आंबेडकर
By Admin | Updated: April 21, 2017 21:41 IST2017-04-21T21:41:13+5:302017-04-21T21:41:13+5:30
सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच

समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल - अँड.आंबेडकर
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 21 - सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल होत असतो, असे सांगत अड प्रकाश आंबेडकरानी स्री दास्यातून कशी मुक्त होईल यावर प्रकाश टाकला.
जळगाव, दि. 21 - सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल होत असतो, असे सांगत अड प्रकाश आंबेडकरानी स्री दास्यातून कशी मुक्त होईल यावर प्रकाश टाकला.
अमळनेर येथील रेल्वे हास्पिटल समोरील मैदानावर रेल्वे कर्मचारी कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई रेल्वे विभागाचे अध्यक्ष शकुंतला ए वावल, व पी बैरवा सचिव, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त वाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जात वर्ग स्री दास्य अंतक क्रांती साठी फुले आणि आंबेडकर यांचे योगदान यावर बोलताना सांगितले की, फुल्यांनी शिक्षणाची दारे उघडली. तिचे सार्वत्रिकीरण झाले पाहिजे, ते सर्वाना मिळाले पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे. तसेच फुले आणि आंबेडकरांनी वास्तववादी आंदोलन उभे केले, त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यातून लोकलढा उभा राहिला म्हणून ते यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समाजातील सुशिक्षित महाभाग आज स्वतःला डॉ आंबेडकरा पेक्षा मोठे समजायला लागले आहेत, आणि हेच महाभाग इतिहास बदलायला निघाले आहेत. वैदिक काळा पासून ते सध्याच्या परिस्थितीत स्रीयांच्या स्थितीत वर बोलताना त्यांनी समाज संकुचित होत असल्याचे सांगत विविध घटनांवर प्रकाश टाकला,
स्री दास्यातून मुक्त होण्यासाठी जातमुक्त होणे गरजे चे आहे, हिंदू कोड बिल हे 90 टक्के सवर्ण समाजाच्या स्रीयांसाठी मांडले होते, तर पुणे करारावर बोलताना त्यांनी सांगितले की, यातुन आरक्षण हे तत्व म्हणून मान्य करण्यात आले, आणि कोरेगाव विजयांनातर दोनशे वर्षांनी समाजाला यातून काही तरी यश मिळाले .