चांगदेव वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:07+5:302021-05-19T04:17:07+5:30

जळगाव : चांगदेव वानखेडे (वय ६१, मूळ रा. खिरोदा) यांचे १७ मे रोजी सकाळी आठ वाजता ...

Changdev Wankhede | चांगदेव वानखेडे

चांगदेव वानखेडे

जळगाव : चांगदेव वानखेडे (वय ६१, मूळ रा. खिरोदा) यांचे १७ मे रोजी सकाळी आठ वाजता जळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-----

काशिनाथ बडगुजर

जळगाव : काशिनाथ बडगुजर (वय ५२, रा. महाबळ गाडगेबाबा चौक) यांचे १८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. ते जिजाबराव बडगुजर यांचे मोठे बंधू होत.

-------

फोटो नं. : १८ धनंजय चौधरी -निधन.

धनंजय चौधरी

जळगाव : धनंजय चौधरी (वय ७७) यांचे १७ रोजी दुपारी १२ वाजता पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते पुणे येथील डॉ. तानसेन चौधरी यांचे वडील होत.

-----

शकुंतला राणे

जळगाव : शकुंतला राणे (वय ७८, रा. प्रभात कॉलनी) यांचे दि. १८ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात चार भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्या माजी नगरसेवक अरविंद राणे यांची बहीण होत.

-----------

विजय कानडे

जळगाव : विजय कानडे (वय ७३, रा. साची अपार्टमेंट, महाबळ) यांचे दि. १७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते. सेवानिवृत्त बँक कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सचिन कानडे यांचे वडील होत.

-----

नथा जाधव

जळगाव : नथा जाधव (वय ८३, रा. काशिनाथ लॉज, एमआयडीसी) यांचे दि. १८ रोजी निधन झाले. ते पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. सुरेश जाधव यांचे ते वडील होत.

---------

रघुनाथ पाटील

जळगाव : रघुनाथ पाटील (वय ७०, मूळ रहिवासी शिंदी, ता. भुसावळ ह.मु. महाबळ परिसर जळगाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सेवा निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते हेमंत क्लासेसचे संचालक हेमंत पाटील यांचे वडील होत.

--------

विनोद पाटील

जळगाव : विनोद पाटील (वय ३६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचे दि. १४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. ते प्रभाकर पाटील यांचे चिरंजीव होत.

---------

Web Title: Changdev Wankhede