चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST2021-07-04T04:12:47+5:302021-07-04T04:12:47+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात गोदावरी फाऊंडेशन संचलित ...

चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या एलएलएम व एलएलबी वर्गातून दोन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील एलएलबी या अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. अंतिम सत्राच्या निकालानंतर झालेल्या ऑनलाइन पदवीप्रदान समारंभात डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील पदव्युत्तर परीक्षेत यशवंत कोंडू चित्ते व एलएलबी तृतीय वर्ष अभ्यासक्रमातून चंद्रकांत रमेशचंद्र अग्रवाल यांना सिव्हिल प्रोसिजर कोड या विषयासाठी सुवर्णपदक बहाल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस.जी. गाडगे यांनी अभिनंदन केले आहे.