फुपनगरीत तरुणाईने उभे केले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:05+5:302021-01-08T04:46:05+5:30
जळगाव - फुपनगरी येथील ग्रामपंचायतीच्या ८ जागांसाठी एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. राहुल जाधव व गणेश जाधव या ...

फुपनगरीत तरुणाईने उभे केले आव्हान
जळगाव - फुपनगरी येथील ग्रामपंचायतीच्या ८ जागांसाठी एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. राहुल जाधव व गणेश जाधव या युवकांच्या पॅनल विरोधात माजी सरपंच जितेंद्र अत्रे यांचे पॅनल आहे. अत्रे यांच्या पॅनलमध्ये देखील तरुणाईचा भरणा असून, जाधव यांच्या पॅनलमध्ये देखील तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच ज्येष्ठांनी या निवडणुकीत माघार घेत तरुणाईला संधी दिली आहे. गणेश जाधव यांनी पुढाकार घेत तरुणाईला आवाहन करत निवडणुकीत तरुणाईची मोट बांधली आहे. यामुळे परिसरात फुपनगरीची निवडणूक देखील चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रभाग क्रमांक १
राहुल जाधव - सचिन सोनवणे
प्रमिला चौधरी - योगिता जाधव
सिंधूबाई सपकाळे - हेमलता जाधव
प्रभाग २
छाया जाधव - प्रियंका सोनवणे
युवराज पवार - चंद्रकांत सपकाळे
महेश अत्रे - हेमराज जाधव
प्रभाग ३
अविनाश नेरकर - राजेंद्र विसावे
छाया कांबळे - गुंफाबाई भालेराव
संगीता पवार - भारती सोनवणे