आरंभ झाला आता टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:57+5:302021-01-19T04:18:57+5:30

पहिल्या दिवशी केंद्राकडून एकत्रीत उद्घाटन झाल्याने सुरूवातीचे दोन तास कमी मिळाले होते. मंगळवारपासून मात्र, सकाळी ९ ते ५ या ...

The challenge now is to complete the target | आरंभ झाला आता टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान

आरंभ झाला आता टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान

पहिल्या दिवशी केंद्राकडून एकत्रीत उद्घाटन झाल्याने सुरूवातीचे दोन तास कमी मिळाले होते. मंगळवारपासून मात्र, सकाळी ९ ते ५ या वेळेत ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास, चोपडा, चाळीसगाव, भुसावळ, पारोळा, जामनेर या रुग्णालयांसह महापालिकेच्या डी. बी. जैन. रुग्णालयात पुन्हा प्रत्येकी शंभर अशा सातशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. कोविन ॲप आता सुस्थित सुरू असल्याचा यंत्रणेचा दावा आहे. सोमवारी एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती.

या आठवड्यात हे दिवस

मंगळवार

बुधवार

शुक्रवार

शनिवार

ही सौम्य लक्षणे काहींना येतील

खांदा दुखतो दीड ते दोन दिवस

७० टक्के थकवा जाणवतो

क्वचित थंडी वाजते

अंग गरम होणे सौम्य ताप

सांधेदुखी, अंगदुखी डोकेदुखी ७० टक्के

आवश्यकतेनुसार पॅरासिटामॉल एक एक गोळी घेऊ शकतात. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

मनापाचे सध्या तेच केंद्र

महापालिकेच्या डी.बी. जैन रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. मात्र, केंद्रावर कोणाला गंभीर रिॲक्शन आल्यास बाहेर रुग्णालयात हलविणे जड जाणार आहे. अशा स्थितीत हे केंद्र बदलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, केंद्र बदलवायचे झाल्यास आधी कोविन ॲपवर ते बदलवावे लागणार आहे. अन्यथा जागा बदलली तर तारांबळ उडण्याची अधिक शक्यता आहे. अशा स्थिती महापालिकेसमोर हा एक पेच निर्माण झाला होता. अखेर याच केंद्रात हे लसीकरण होणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.

ही कारणे आली समोर

पहिल्या दिवशी ६३ टक्क्यांवर लसीकरण झाले. जळगाव जिल्हा राज्यात वीसाव्या क्रमांकावर राहिला. मात्र, ही संख्याही समाधानकारक असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे. यात काही कारणे सांगण्यात येत आहेत.

- अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात भीती होती.

- काही कर्मचारी कामावर असल्याने त्यांनी लस घेतली नाही.

- अनेकांनी चार पाच सत्र आटोपल्यानंतर लस घेऊ अशी मानसिकता बाळगली.

Web Title: The challenge now is to complete the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.