आव्हाण्यात ३५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:54+5:302021-07-11T04:13:54+5:30

लोकमत रक्ताचे नाते : आव्हाणे फर्स्टचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत रक्ताचे नाते’ अभियानाअंतर्गत शनिवारी सकाळी ९ ...

In the challenge, 35 people donated blood | आव्हाण्यात ३५ जणांनी केले रक्तदान

आव्हाण्यात ३५ जणांनी केले रक्तदान

लोकमत रक्ताचे नाते : आव्हाणे फर्स्टचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘लोकमत रक्ताचे नाते’ अभियानाअंतर्गत शनिवारी सकाळी ९ वाजता आव्हाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील ३५ जणांनी रक्तदान करत या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभाग घेत, रक्तदान केले.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, शिवसेनेचे विलास नारायण चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, भास्कर चौधरी, आव्हाणे फर्स्टचे संचालक राकेश चौधरी, श्रीकांत चौधरी, प्रशांत चौधरी, सुनील पाटील, सोपान पाटील, योगी संस्थेचे प्रणील चौधरी, वंदे मातरम युवा संघटनेचे रूपेश चौधरी, पंकज चौधरी, नचिकेत चौधरी आदी उपस्थित होते. यासह आव्हाणे हायस्कूल आव्हाणे येथील शिक्षक व्ही.डी.चौधरी, एल.डी.पाटील यांचे सहकार्य देखील या शिबिराला लाभले.

Web Title: In the challenge, 35 people donated blood