शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

चाळीसगावच्या 'सर्वोदय'मध्ये सत्ताधारीच 'किंगमेकर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 10:06 PM

विरोधकांचा निवडणुकीत सपशेल धुव्वा उडाला.

चाळीसगाव : कोरोना महामारीसह टाळेबंदीत निवडणुक होत असलेल्या उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीचा सोमवारी लागलेल्या निकालात विद्यमान सत्ताधारीच किंगमेकर ठरले आहे. कै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार स्मृती पॕनलने सर्व १९ जागा जिंकत विरोधी परिवर्तन पॕनलचा सपशेल धुव्वा उडविला आहे. मतदारांनी सत्ताधा-यांना एकतर्फी कौल दिल्याने विरोधी पॕनलचे तिघेही प्रमुखही पराभूत झाले आहे. माजी जि.प.सदस्य व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास पंडितराव पाटील व विद्यमान सचीव उदेसिंग मोहन पाटील यांनी सत्ता पुन्हा राखत संस्थेवरील आपली मांड पक्की केली आहे.संस्थेच्या १९ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकुण ८८ टक्के मतदान झाले. न्यायालयाच्या निर्णयाने ऐनवेळी नव्याने केलेल्या ६७० सभासदांनाही मतदानाची संधी मिळाली. एकुण ४६८१ पैकी ४६२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सोमवारी उंबरखेडे येथील संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात एकुण १० टेबलवर मतमोजणी सुरु झाली. सुरुवातील सर्व मतपत्रिकेचे संकलन करुन गठ्ठे तयार केले गेले. यानंतर महिला राखीव, अनु जाती - जमाती, इतर मागास, भटक्या - विमुक्त गटातील निकाल जाहिर केले गेले. मतमोजणीच्या एकुण २७ फे-या झाल्या. एका फेरीत १५० मतांची मोजणी झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विजयसिंग गवळी यांनी काम पाहिले. त्यांना एकुण २५ कर्मचा-यांनी सहकार्य केले. सर्वात शेवटी सर्वधारण गटातील मतांची मोजणी झाली.....चौकटविजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशीःविमुक्त जाती - भटक्या जमाती - उदेसिंग मोहन पाटील (२६७७)इतर मागास - संजय संतोष पाटील (२४५५), अनु जाती - जमाती - वर्षा नाना कोळी (२४९८), महिला राखीव - अनिता नितिन पाटील - (२३९६), साधना शामकांत निकम - (२३२३)......सर्वसाधारण गट....सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मतेभगवान अमरसिंग पाटील - (२५४९), विकास पंडितराव पाटील - (२५१४), प्रशांत मुरलीधर पाटील - (२४८७), प्रविण भिकन पाटील - (२४४५), राजेंद्र महारु पाटील - (२४४५), नरसिंग हाटेसिंग पाटील - (२४३५), योगेश नीळकंठ भोकरे - (२३९२), उमेश प्रकाश करपे - (२३८५), सुरेश श्रीपतराव सोनवणे - (२३६४), इंद्रसिंग उदेसिंग पवार - (२३६१), आनंदा फकिरा पाटील - (२३१२), भाऊसाहेब भिकनराव जगताप - (२२८१), अशोक परमेश्वर चौधरी - (२१९६), नेताजी कैलास हिरे - (२१८३) या गटात भगवान अमरसिंग पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली आहे.....विरोधकांचा खोटा प्रचार नाकारलाकै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार यांच्या विचारांचे पाईक म्हणून मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. सर्व कार्यकर्त्यांची एकजूटीचा हा विजय आहे. विरोधकांचा खोटा प्रचार मतदारांनी पूर्णपणे नाकारला. संस्थेच्या पारदर्शी कारभारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- विकास पंडितराव पाटीलप्रमुख स्मृती पॕनल व विद्यमान अध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था......सभासद विश्वास सार्थ ठरवूविरोधकांनी खोट्या प्रचाराच्या तोफा वाजवल्या. मात्र सभासद मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या याविश्वासाला तडा जाऊ देणार नाही.- उदेसिंग मोहन पाटीलप्रमुख स्मृती पॕनल व विद्यमान सचीव, सर्वोदय शिक्षण संस्था.......'त्या' मतदारांमुळे बसला फटकासत्ताधा-यांनी बोगसरित्या केलेल्या ६७० सभासदांचा फटका बसल्यानेच आमचा पराभव झाला. आम्ही याविरोधात न्यायालयातही दाद मागितली होती. बाद होणा-या मतदानाची संख्या देखील मोठी आहे.- रवींद्र चुडामण पाटीलप्रमुख परिवर्तन पॕनल

टॅग्स :ElectionनिवडणूकChalisgaonचाळीसगाव