जिजाबराव वाघचाळीसगाव : मधुमेहाच्या त्रासाने पतीच्या दोन्ही किडन्या निकामी होतात...मृत्युच्या दाढेत पतीला पाहतांना तिला उन्मळून पडायला होते...अशा हतबलतेतूनही स्वत:ला सावरत ती उभी राहते...किडनी मॅच होत नसतांनाही अत्याधुनिक उपचार उपद्धतीला सामोरी जाते...अखेरीस किडनी प्रत्यारोपण यशस्वी होते...रुग्णालयातील सर्वच तिचे 'पतीला जीवदान देणारी नवदुर्गा' असं म्हणत गळाभेट घेतात. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी. अशी ही सत्य घटना.चाळीसगावच्या शिवशक्ती नगरात राहणा-या माधुरी भरत ठाकुर यांची. त्यांचे पती प्राथमिक शिक्षक भरत ठाकुर यांना त्यांनी किडनी दान करुन त्या एकप्रकारे 'नवदुर्गा' ठरल्या आहेत.माधुरी ठाकुर यांचं चौकोनी कुटूंब. त्यांना दोन मुले आहेत. भरत ठाकुर यांना २००९ मध्ये मधुमेहान ग्रासलं. पुढे हा त्रास अधिक वाढत गेला. त्यांना नोकरी करणेही कठीण झाले. डायलिसिस करतांना वैद्यकीय खर्चामुळे ओढताण होऊ लागली. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरु असल्याने कुटूंबाचा भार माधुरी यांच्यावर येऊन पडला. पुढे भरत यांच्या दोन्ही किडन्याच निकामी झाल्या. संपूर्ण कुटूंबासमोर अंधार उभा राहिला. किडनी देऊ इच्छिणा-यांचा शोध सुरु झाला. काही नातेवाईकांनी अश्वासने दिली. अखेरीस माधुरी यांनीच स्वत:ची किडनी देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह तर भरत यांचा ओ पॉझिटिव्ह. रक्तगट जुळत नसल्याने किडनी प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. ५४ वर्षीय भरत आणि ४८ वर्षीय माधुरी यांनी जीवनदानाची ही लढाई अर्ध्यावर सोडली नाही. मुंबईस्थित एका खासगी रुग्णालयाने त्यांना आशेचा किरण दाखवला. रक्तगट जुळत नसतांनाही याच रुग्णालयात २५ मार्च २०१६ रोजी भरत ठाकुर यांना माधुरी ठाकुर यांनी दिलेल्या किडनीचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले.
पतीला जीवदान देणारी चाळीसगावची 'नवदुर्गा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:33 IST
चाळीसगावच्या शिवशक्ती नगरात राहणा-या माधुरी भरत ठाकुर यांची. त्यांचे पती प्राथमिक शिक्षक भरत ठाकुर यांना त्यांनी किडनी दान करुन त्या एकप्रकारे 'नवदुर्गा' ठरल्या आहेत.
पतीला जीवदान देणारी चाळीसगावची 'नवदुर्गा'
ठळक मुद्देकठीण परिस्थितीत केले किडनीचे प्रत्यारोपणरक्तगट जुळत नसतांनाही यशस्वी शस्त्रक्रियामाधुरी ठाकूर यांनी स्वत:च किडनी देण्याचा घेतला निर्णय