चाळीसगाव : कल्याण क्राईम ब्रॅन्च युनिट-३ मध्ये कार्यरत असलेले चाळीसगावचे रहिवासी पो. कॉ. अजितसिंह सुनिलसिंह राजपूत यांना ऑक्टोबर २०१९ मध्ये डोंबवली पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्हाचा उत्कृष्ठ तपास करुन गुन्ह्याची उकल केल्याबद्दल त्यांना नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु. जायस्वाल यांच्या पुरस्काराने एका कार्यक्रमात नुकतेच सन्मानित करण्यात आले.ठाणे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महिलेचा झालेला खून आणि या खुनाच्या तपासासाठी कुठलाही सबळ ओळखीचे पुरावे नसताना तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात जावून तपासाची चक्रे फिरवीत गुन्ह्याची उकल करण्यात आली. यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले म्हणून पोलीस महासंचालकांचे हे प्रशस्तीपत्र त्यांना काल पोलीस आयुक्त विवेक संसाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. अजितसिंह राजपूत हे चाळीसगाव येथील पत्रकारष सुनीलसिंह राजपूत यांचे सुपुत्र आहेत.
चाळीसगावकर पो. कॉ. अजितसिंह राजपूत पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 15:57 IST
चाळीसगावकर पो. कॉ. अजितसिंह राजपूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चाळीसगावकर पो. कॉ. अजितसिंह राजपूत पुरस्काराने सन्मानित
ठळक मुद्देचाळीसगावचे रहिवासीखुनाच्या गुन्ह्याची केली उकलठाणे येथे क्राईम बॕचमध्ये कार्यरतमहासंचालकांकडून पुरस्काराने सन्मानित