चाळीसगावच्या तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू

By Admin | Updated: May 13, 2014 00:11 IST2014-05-13T00:11:17+5:302014-05-13T00:11:17+5:30

जळगाव : हिरापूर ते शिरसोलीदरम्यान प्रवास करीत असलेला चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.।। येथील विजय नारायण तांबे (वय-३२) हा तरुण धावत्या रेल्वेतून पडला

Chalisgaon youth dies due to falling from train | चाळीसगावच्या तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू

चाळीसगावच्या तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू

जळगाव : हिरापूर ते शिरसोलीदरम्यान प्रवास करीत असलेला चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.।। येथील विजय नारायण तांबे (वय-३२) हा तरुण धावत्या रेल्वेतून पडला. उपचारादरम्यान या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच हॉलिडे एक्स्प्रेसमध्ये प्रवास करीत असलेल्या यवतमाळ येथील दुसर्‍या प्रवाशाचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.।। येथील विजय नारायण तांबे हा सोमवारी देवळाली-भुसावळ पॅसेंजरने प्रवास करीत होता. पॅसेंजर शिरसोलीजवळ आल्यानंतर तांबे धावत्या रेल्वेतून खाली पडला. यात त्याचे दोन्ही पाय कापले जाऊन पोटाला व छातीत मुकामार बसला. सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत हॉलिडे एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेला यवतमाळ जिल्ह्यातील पिरण येथील रहिवासी रमेश नारायण घुले (वय-३२) याला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अवस्थ वाटू लागले. त्यानंतर तो उपचारासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर उतरला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. तपास हे.कॉ. आंबेकर करीत आहेत.

Web Title: Chalisgaon youth dies due to falling from train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.