चाळीसगावला पुरानंतर साफसफाईचे काम हाती....जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:49+5:302021-09-02T04:36:49+5:30

राजीव देशमुख, रवींद्र पाटील यांनीही केली पाहणी बुधवारी शिवाजी घाट परिसरासह पूरग्रस्त अन्य भागांची पाहणी माजी आमदार व जिल्हा ...

Chalisgaon is under cleaning after floods | चाळीसगावला पुरानंतर साफसफाईचे काम हाती....जोड

चाळीसगावला पुरानंतर साफसफाईचे काम हाती....जोड

राजीव देशमुख, रवींद्र पाटील यांनीही केली पाहणी

बुधवारी शिवाजी घाट परिसरासह पूरग्रस्त अन्य भागांची पाहणी माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीव देशमुख व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून धीरही दिला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा किसन जोर्वेकर, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, रोशन जाधव आदी उपस्थित होते.

२...खासदार उन्मेष पाटील यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी करून, तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

चौकट

आमदारांनी घेतली ग्रामीण भागातील पूरग्रस्तांची भेट

आमदार मंगेश चव्हाण यांनी हिंगोणेसिम येथून पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केला. पूरग्रस्तांना त्यांनी धीर देत मदतीबाबतही आश्वासित केले. यावेळी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, पंचायत समिती भाजप गटनेते संजय पाटील, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजू पाटील, वाल्मिक पाटील, शिवदास महाजन, गिरीश बऱ्हाटे, बाळासाहेब बोरसे, नितेश पाटील, राकेश पाटील, सुरेश महाराज, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

पंचनाम्याचा फार्स करू नका. तातडीने मदत द्या. गेल्या दोन वर्षात वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती असो वा गारपीट असो. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले गेले. मात्र, त्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांचा हा गतकाळातील अनुभव वाईट आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा फक्त फार्स न राहता राज्य शासनाने कोकणच्या धर्तीवर तातडीने मदत जाहीर करावी.

-उन्मेष पाटील, खासदार, जळगाव लोकसभा

Web Title: Chalisgaon is under cleaning after floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.