चाळीसगाव येथे एकात्मतेचे प्रतिक असलेल्या ऊरुस ला प्रारंभ

By Admin | Updated: April 13, 2017 17:20 IST2017-04-13T17:20:13+5:302017-04-13T17:20:13+5:30

हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या ऊरुसाला 12 तारखेपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे.

In Chalisgaon, there is a symbol of unity in the beginning of Ursus | चाळीसगाव येथे एकात्मतेचे प्रतिक असलेल्या ऊरुस ला प्रारंभ

चाळीसगाव येथे एकात्मतेचे प्रतिक असलेल्या ऊरुस ला प्रारंभ

 चाळीसगाव,दि.13- हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या ऊरुसाला 12 तारखेपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. 

12 रोजी सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली तर 13 रोजी तलवार मिरवणूक निघाली. तलवार घेवून जाण्याचा मान भालचंद्र देशमुख यांना मिळाला. अनेक वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. विशेष म्हणजे  या उत्सवात मुस्लीम व हिंदू समाज एकत्रित सहभाग घेतात.
रज्जबच्या 14 व्या दिवशी पीर मुसा कादरी बाबांचा  अंतकाळ झाला असे मानतात. त्याच दिवशी ऊरुस भरला जातो. पंधराव्या दिवशी देशमुखांकडील तलवार वाजत गाजत मिरणवुकीने आणली जाते. सायंकाळी निघालेली मिवणूक रात्री 11 वाजेर्पयत दग्र्यात पोहचते. त्यानंतर दर्शनासाठी  तलवार दग्र्यावर ठेवली जाते. मनोकामना  पूर्ण होण्यासाठी दग्र्यावर वाजतगाजत चादर  चढवतात. दोन-तीन दिवसांनी परत देशमुखवाडय़ात तलवार नेली जाते. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. 
झाले शाही स्नान
यात्रोत्सवात दर्शनासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोप:यातून लाखो भाविक येतात.  दग्र्यावर व परिसरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून दग्र्यावर चादरचढवून रंगरंगोटी करण्यात आली आहे. 12 रोजी शाही स्नान   करण्यात आले. यासाठी गुलाब पाणी, अत्तर व दुध याने बामोशीबाबांच्या दग्र्यास स्नान घालून नवीन चादर चढविण्यात आली.

Web Title: In Chalisgaon, there is a symbol of unity in the beginning of Ursus