चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत एकाचा सुरा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:57 IST2019-05-20T14:56:42+5:302019-05-20T14:57:29+5:30

चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून दोघा भावांवर झालेल्या खुनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. दुस-यालाही गंभीर दुखापत झाल्याने तो अत्यवस्थ आहे.

Chalisgaon taluka of Beldewadi, one of the murderers killed | चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत एकाचा सुरा भोसकून खून

चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत एकाचा सुरा भोसकून खून

ठळक मुद्देभावकीचा रक्तरंजित वाददुसरा अत्यवस्थखुनाचा गुन्हा दाखल

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून दोघा भावांवर झालेल्या खुनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. दुस-यालाही गंभीर दुखापत झाल्याने तो अत्यवस्थ आहे. त्याच्यावर चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, मागील भांडणाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर सुभाष कुमावत (वय ३२) याच्या पोटात बापू उर्फ पिंटू सीताराम कुमावत, छोटीबाई गोपीचंद कुमावत, किरणबाई राकेश कुमावत यांनी धारदार शस्त्राने वार केले. पोटात घाव लागल्याने तो जागीच ठार झाला. त्याचा भाऊ ईश्वर सुभाष कुमावत हा ज्ञानेश्वर यास वाचविण्यासाठी गेला असता आरोपी बापू कुमावत याने त्याच्याही पोटात सुरा खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर डॉ.जयवंत देवरे उपचार करीत आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशनला संतोष सुभाष कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू उर्फ पिंटू सीताराम कुमावत, छोटीबाई गोपीचंद कुमावत, किरणबाई राकेश कुमावत ( सर्व रा.बेलदारवाडी, चाळीसगाव) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघेही आरोपी फरार झाले आहे. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकरे तपास करीत आहे.

Web Title: Chalisgaon taluka of Beldewadi, one of the murderers killed