Chalisgaon Municipality launches anti-encroachment drive | चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात

चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात

चाळीसगाव : नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटावण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा ठरणारी तसेच नागरिकांना अडचण ठरत असलेल्या अतिक्रमणे हटावण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 
नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता मोहिमेस सुरुवात करण्यात आल्यानंतर शहरातील भडगावरोड, हिरापूररोड, धुळेरोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या धारकांना यापूर्वी नोटीस देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्यात येवून अतिक्रमणे हटवली जातील, असे अतिक्रमण विभागप्रमुख प्रेमसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगर अभियंता विजय पाटील, अतिक्रमण विभागप्रमुख प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, आरोग्य निरीक्षक संजय गोयर सुमित सोनवणे, तुषार माने, मेहमूद बेग, भगवान आगोणे, वकार शेख, शेख सलिम आदी कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title: Chalisgaon Municipality launches anti-encroachment drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.