शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

चाळीसगाव मतदार संघात 'आमदार कप' मिळविण्यासाठी इच्छुकांची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:17 IST

विधानसभा काऊंटडाऊन : भाजपचे शक्तीप्रदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शांतता

जिजाबराव वाघ।चाळीसगाव: लोकसभा निवडणुकीचा धुराळ खाली बसल्याबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी आरंभिली आहे. २०१९ चा 'आमदार कप' मिळविण्यासाठी इच्छुकांची चढाओढ सुरु असून शक्तिप्रदर्शनात भाजपा फ्रंटफुटवर तर राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार राजीव देशमुख यांचे एकमेव नाव चर्चेत आहे.२०१४ च्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या उन्मेष पाटील यांनी आमदार राजीव देशमुख यांचा २२हजार ३८० मतांनी पराभव करीत तालुक्याच्या राजकारणाची भाकर फिरवली. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यात एकही दिवस प्रचार न करता ६४ हजार ९११ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. उन्मेष पाटील खासदार झाल्याने आमदारकीसाठी भाजपात मोहोळ उठावे, अशी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.युती आणि आघाडी न झाल्यासहोऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही 'आमच ठरलंय' असं सांगणा-या भाजपा - सेना मध्ये उमेदवारीवरुन पुन्हा कलह झाला तर शिवसेनेतफेर्ही स्ट्रॉग उमेदवाराचा शोध घेतला जाऊ शकतो. गेल्या निवडणुकीत अशोक खलाणे यांच्या हाती काँग्रेसचा 'पंजा' होता. आघाडी न झाल्यास खलाणे पुन्हा शड्डू ठोकू शकतात.'कमळ' कुणाच्या हातीउन्मेष पाटील संसदेत पोहचल्यानंतर भाजपात विधानसभेत जाण्यासाठी अनेकांच्या निवडणुक लढविण्याच्या मनसुब्यांना उकळी फुटली आहे.गेल्या आठवड्यात खासदार उन्मेष पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांच्या पत्नी 'संपदा पाटील तूम आगे बढो' अशा घोषणा देण्यात आल्या.आपल्या आमदारकीच्या रिक्त जागेवर उन्मेष पाटील संपदा पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवू शकतात. संपदा पाटील गेल्या सहा ते सात वषार्पासून उमंग सामाजशिल्पी महिला परिवाराच्या माध्यमातून जनतेच्या टच मध्ये आहेत. 'वंचित'चीही चाचपणीलोकसभा निवडणुकीत वंचित - बहुजन आघाडीच्या उमेदवाराला संपूर्ण मतदारसंघात सर्वाधिक १० हजार मते चाळीसगाव तालुक्यात मिळाले आहे. विधानसभेसाठी वंचिततर्फे देखील चाचपणी केली जात आहे.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपउन्मेष पाटील यांचे मित्र मंगेश रमेश चव्हाण, बेलगंगाचे चेअरमन चित्रसेन पाटील, डॉ. विनोद कोतकर, ऊसतोड मजुरांचे ठेकेदार किशोर पाटील ढोमणेकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, सतीष दराडे, माजी जि.प. सदस्य धर्मा वाघ, डॉ. सुनील राजपुत.शिवसेनाउपजिल्हाप्रमुख व अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक उमेश गुंजाळ, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, शहर प्रमुख व नगरसेवक श्यामलाल कुमावतराष्ट्रवादी व इतरराष्ट्रवादीकडून माजी आमदार राजीव देशमुख, काँग्रेसकडून अशोक खलाणे, बाळासाहेब भावराव पाटील, धनंजय चव्हाण, अ‍ॅड. वाडीलाल चव्हाण तर वंचितकडून माजी जि.प.सदस्य सुभाष हिरालाल चव्हाण, डॉ. मोरसिंग राठोड, डॉ. तुषार राठोड राकेश जाधव.

टॅग्स :Politicsराजकारण