चाळीसगावला आजपासून भरडधान्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 14:59 IST2021-06-11T14:57:46+5:302021-06-11T14:59:31+5:30
सद्य:स्थितीत फक्त ज्वारीच खरेदीचे आदेश आहे.

चाळीसगावला आजपासून भरडधान्य खरेदी
चाळीसगाव : भरड धान्य खरेदीचे आदेश आले असून बारदानही उपलब्ध झाल्याने शनिवारपासून शासकीय खरेदी केंद्रावर काटापूजन करुन शुभारंभ केला जाणार आहे. सद्य:स्थितीत फक्त ज्वारीच खरेदीचे आदेश आहे. मका खरेदीनंतर केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी दिली.
चाळीसगाव येथे शेतकरी सहकारी संघाच्या शासकीय खरेदी केंद्रावर तालुक्यातील १५९४ शेतकऱ्यांनी भरडधान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिल रोजी संपली आहे. गेल्या एक महिन्यापासून उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा होती. शनिवारपासून खरेदी सुरू होत आहे.
ज्वारी खरेदीचेच आदेश
सद्य:स्थितीत ज्वारी खरेदीचेच आदेश आले आहे. २४०० क्विंटल खरेदीचीच मर्यादा आहे. २६२० रुपये हमीभावाने ज्वारी खरेदी केली जाणार आहे. मका खरेदीचे आदेश नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी पुन्हा वाट पहावी लागणार आहे.
- रब्बी हंगाम संपला असून मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून ज्वारी सोबतच मका खरेदीही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
- भरडधान्य खरेदीस उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने मका व ज्वारी विकावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
- भरडधान्याचे शासकीय हमीभाव व खासगी व्यापाऱ्यांकडून दिले जाणारे भाव यात तफावत आहे.
- ज्वारी खरेदीत साधारण एक हजार तर मका खरेदीत ४५० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
- शनिवारपासून शासकीय खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.