चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीच्या चाळीसगाव शाखेची नूतन कार्यकारिणी रविवारी निवडण्यात आली. शाखाध्यक्षपदी दिलीप चव्हाण, तर कार्याध्यक्षपदी वैशाली गौतम निकम यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी अंनिसचे कार्यवाह विनायक सावळे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दिगंबर कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली.उर्वरित कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष सागर नागणे, सचिव प्रा. . मु. पाटील, प्रा. संगीता पाटील यांची वैज्ञानिक जाणीव प्रकल्प कार्यवाह, तर कवी गौतमकुमार निकम यांची बुवाबाजी संघर्ष कार्यवाह व राहुल दिलीप पाटील यांची विविध उपक्रम कार्यवाहपदी निवड झाली.यावेळी नीता सामंत, सी.सी.वाणी, प्रा.गौतम निकम, सुनील वाघमोडे, नीलेश परदेशी, गणेश भोई, प्रल्हाद सावंत, गणेश पवार, विकास जाधव, सुजय देशमुख, पवन राठोड व गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.
चाळीसगाव अंनिस कार्यकारिणी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:58 IST
महाराष्ट अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीच्या चाळीसगाव शाखेची नूतन कार्यकारिणी रविवारी निवडण्यात आली.
चाळीसगाव अंनिस कार्यकारिणी बिनविरोध
ठळक मुद्देशाखाध्यक्षपदी दिलीप चव्हाणकार्याध्यक्षपदी वैशाली निकम