चाळीसगावी एकाच दिवशी आढळले ९५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 22:31 IST2020-09-07T22:30:52+5:302020-09-07T22:31:03+5:30
कोरोनाचा कहर

चाळीसगावी एकाच दिवशी आढळले ९५ रुग्ण
चाळीसगाव : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून सोमवारी आलेल्या अहवालावरून ९५ नवे कोरोनो पॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आज सर्वात जास्त रुग्ण आढळल्याची नोंद झाल्यामुळे अधिक चिंता व्यक्त झाली आहे.
आता एकूण बाधितांची संख्या २०४४ इतकी झाली आहे तसेच एकूण मृत्यूची संख्या ६० वर गेली आहे.सध्या ५६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एकूण १४२३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात रुग्ण संख्या अगदी कमी होती मात्र गेल्या आठवडाभरापासून मोठया संख्येने रुग्ण आढळत असल्याने तालुकावासी भयभीत झाले आहेत.