शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:36 IST

यु.एस.ओपन स्पर्धेसाठी मारिया शारापोव्हा हिने खास डिझाईन केलाय लेस व क्रिस्टल्सचा नक्षीदार काळा ड्रेस

ललित झांबरे / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २४ - देखणी स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हा येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या यु.एस.ओपनमध्ये एका आगळ्यावेगळ्या झगमगत्या पोशाखात खेळताना दिसेल. हा पोशाख चर्चेचा विषय ठरण्याचे कारण म्हणजे त्यांचे रंग आणि त्याची डिझाईन.सहसा टेनीस म्हटले की पांढरा किंवा हलक्या-मंद रंगांचेच पोशाख डोळ्यासमोर येतात, पण मारियाचा हा ड्रेस असेल टेनीससाठी जवळपास निषिद्ध  समजल्या जाणाºया काळ्या रंगाचा!एवढंच नाही तर त्यात असेल लेस आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या छिद्रांची आकर्षक नक्षी. आणि त्याला 'चार चांद' लावत सौदर्यात आणखी भर घालतील स्वारोवस्कीचे चमचमते क्रिस्टल्स (स्फटिक). आणि हा पोशाख ती वापरणार आहे रात्रीच्या सामन्यांसाठी! आता विचार करा की, लाखो दिलांची धडकन असलेली ही उंचपुरी, देखणी तारका रात्री दिव्यांच्या प्रकाशझोतात क्रिस्टल्सनी चमचमत्या काळ्या रंगाच्या पोशाखात आर्थर अ‍ॅश स्टेडियमच्या कोर्टवर उतरेल तो नजारा काय असेल? 

आता हा प्रश्न पडला असेल की काळा रंगच का? तर २००६ मध्ये मारियाने यु.एस. ओपन जिंकली होती, तेव्हा तिने काळ्या रंगाचाच पोशाख वापरला होता. म्हणजे काळा रंग आपल्यासाठी शुभ आहे असे ती मानते. आणि आता तर डोपींग बॅनमधून बाहेर आल्यावर वाईल्ड कार्डद्वारे मेन ड्रॉमध्ये स्थान मिळाल्यावर भरपूर जणांचा रोष ओढवून घेतल्यावर तिला शुभशकुनांची गरज आहेच. 

एखाद्या खेळाडूच्या पोशाखावर लेस आणि क्रिस्टल्स असं भन्नाट कॉम्बिनेशन असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. नाईकी ब्रँडसाठी डिझायनर रिकार्डो टिस्कीने हा ड्रेस डिझाईन केला आहे. मैदानात उतरताना प्रसिध्द हॉलिवूड तारका आॅड्री हेपबर्नसारखीच मारियासुध्दा सुंदर भासावी असा हा पोशाख असल्याचे टिस्की म्हणतो. चाहत्यांसाठी २६ आॅगस्टपासून नाईकीच्या स्टोअर्समध्येही हा ड्रेस उपलब्ध होणार आहे. परंतु ५०० डॉलर एवढी त्याची महागडी किंमत असणार आहे.