देवळी येथे शेतक-यांचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:26 IST2017-08-14T16:22:03+5:302017-08-14T16:26:26+5:30
शेतकरी सुकाणु समितीतर्फे सोमवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात असून देवळी येथेही सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले.

देवळी येथे शेतक-यांचे चक्काजाम आंदोलन
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव दि. १४ - शेतकरी सुकाणु समितीतर्फे सोमवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात असून देवळी येथेही सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनांसह रयत सेनाही सहभागी झाली होती.
आंदोलकांनी वाहतूक रोखून धरतांनाच सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे तासभर आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
कर्जमाफीबाबत होणारी चालढकल, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती, पिक विम्याचा आॕनलाईन गोंधळ, शेतमालाचे भाव पाडणे आदी प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आर.के.पाटील यांनी यावेळी सरकाराच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टिका केली. रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी देखील शेतक-यांच्या सनदशीर मागण्या मान्य करा, अशी मागणी केली. शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.