एरंडोल येथे चाकूहल्ला

By Admin | Updated: May 20, 2014 01:24 IST2014-05-20T01:24:05+5:302014-05-20T01:24:05+5:30

एरंडोल : किरकोळ कारणावरून सोमवारी सायंकाळी दोन गटात धुमश्चक्री होऊन चाकूहल्ला झाला

Chakahala at Erandol | एरंडोल येथे चाकूहल्ला

एरंडोल येथे चाकूहल्ला

एरंडोल : किरकोळ कारणावरून सोमवारी सायंकाळी दोन गटात धुमश्चक्री होऊन चाकूहल्ला झाला. यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी परस्परांविरुद्ध फिर्याद देण्यात आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकू हल्ल्यामुळे मेनरोडवरील चौकापासून ते विरबाखऊम बुर्‍या मशिदीपर्यंत दुकाने पटापट बंद करण्यात आली. या घटनेत चाकू, गुप्ती, लाठ्या- काठ्या या शस्त्राचा वापर करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश रमेशसिंग परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी हातात लाठ्या-काठ्या, चाकू घेऊन हल्ला केला. दोन गुन्हे दाखल तर दुसर्‍या गटातील रेशमाबाई भगवान भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेनरोडवर आरोपींनी चाकू, गुप्ती, लोखंडी सळई, लाठ्या या हत्यारांचा वापर करून मारहाण केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात किरण भोई, सतीश चौधरी व बंटी चौधरी हे तीन जण जखमी झाले. तपास पो.नि. डी.बी. गायधनी व सहायक पो.नि. अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत. दरम्यान रात्री एरंडोल पोलीस स्टेशनला होम डीवाय.एस.पी. पाडवी यांनी भेट दिली व घटनेची माहिती घेतली. सिद्धार्थ परदेशी, भुरू परदेशी, नीलेश परदेशी, लखन परदेशी, राजू परदेशी, प्रवीण परदेशी, लक्ष्मण परदेशी, बद्रीसिंग परदेशी, राजेंद्र परदेशी, संजय परदेशी, जितेंद्र परदेशी, अजय परदेशी, सतीश परदेशी या आरोपींचा यात समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: Chakahala at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.