शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सुटकारच्या शिक्षकाला भोवला वर्गातील राजेशाही थाट, सीईओंनी केले निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:20 IST

बेशीस्त वर्तणूक व्हायरल

जळगाव : शिस्तीचे धडे देणाऱ्या जि.प. शाळेतील गुरूजींचाच बेंचवर पाय ठेवून मोबाईल बघण््याच्या बेशिस्त वर्तणुकीचा व्हिडिओ समोर आला असून या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ सुटकार ता़चोपडा येथील साहेबराव पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे़साहेबराव गुलाबराव पाटील हे सुटकार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ २६ जुन रोजी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून साहेबरावांनी काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर पाठवून दिले, काही विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना या विद्यार्थ्यांसमोर बेंचवर दोन्ही पाय ठेवून मोबाईल बघत बसले होते़ ग्रामस्थांनी शिक्षकाला विचारणा केल्यानंतर उलट या शिक्षकानेच ग्रामस्थांना उत्तरे न देता शाळेतून हाकलून लावले होते़ ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांनाही याबाबत विचारणा केली मात्र, त्यांनीही उद्धटपणे उत्तरे दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे़ ग्रामस्थांनी शिक्षकाच्या बेशिस्त वर्तणुकीचा व्हीडीओ करून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी कोसोदे यांनी गटशिक्षणाधिकाºयांना शाळेवर चौकशीसाठी पाठविले़ गटशिक्षणाधिकारी डॉ़ भावना भोसले यांनी २८ जून रोजी शाळेत पाहणी केली़ या चौकशीचा अहवाल त्यांनी गटविकास अधिकारी कोसोदे यांच्याकडे सादर केला़ या अहवालानुसार उपशिक्षक पाटील यांचे वर्तन गैरशिस्तीचे व कर्तव्यात कसूर करीत असल्याचे सिद्ध होत असल्याने साहेबराव पाटील यांना उपशिक्षक या पदावरून निलंबित करीत असल्याचे आदेशात म्हटले आहे़ निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय चोपडा पं. स. असेल.सोशल मीडियामुळे प्रकार उघडकीसएका गृहस्थ त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शाळेत आलेले होते़ त्यावेळी हा प्रकार त्यांना निदर्शनास आला़ त्यांनी याचा व्हिडिओ तयार केला़ शिक्षकांना विचारणा केली मात्र, शिक्षकांनी त्यांना हाकलून लावले़ शिक्षकांना धडा शिकविण्यासाठी त्या गृहस्थांनी हा व्हिडिओ गावाच्या एका गृपवर २६ जून रोजीच व्हायरल केला होता़ त्यानंतर रात्रीच हा व्हिडिओ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्याकडे पोहचला़ त्यांनी तत्काळ गटविकास अधिकाºयांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले़ त्यानंतर दोन दिवसांनी तत्काळ सूत्रे हलली़ दरम्यान, २७ रोजी आधी शिक्षक पाटील यांना नोटीस बजावण्यात आली़ होती व त्यानंतर गटशिक्षणाधिकाºयांनी त्यांचा लेखी खुलासा शाळेतच घेतला़ यात आपले वय ५१ आहे़ कंटाळा आला होता, पाय दुखत होते म्हणून अनावधानाने आपण बेंचवर पाय ठेवले होते, असा खुलासा या शिक्षकांनी दिला आहे़ सुटकारच्या शाळेत एक ते चौथीपर्यंंत ९५ विद्यार्थी असून दुसरीच्या वर्गात हा प्रकार घडला़

टॅग्स :Jalgaonजळगाव