‘दीपिका, रसिका, रिद्धी’ची सेंच्युरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:13+5:302021-07-18T04:13:13+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यात जळगाव शहरातील ...

‘दीपिका, रसिका, रिद्धी’ची सेंच्युरी !
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यात जळगाव शहरातील उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशन स्कूलची दीपिका घैसास व प.न. लुंकड कन्या शाळेच्या रसिका ढेपे व रिद्धी पाटील या विद्यार्थिनींनी चक्क गुणांची सेंच्युरी मारली आहे. या विद्यार्थिनींना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला; पण एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांनी मंडळाच्या दोन्ही वेबसाइटला भेट दिली. परिणामी, मंडळाच्या दोन्ही वेबसाइट क्रॅश झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांना शुक्रवारी निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, शनिवारी सकाळी मंडळाच्या दोन्ही वेबसाइट सुरळीत झाल्या. त्यामुळे एक दिवस उशिराने अर्थात शनिवारी विद्यार्थ्यांसह शाळांना निकाल पाहायला मिळाला. यावेळी शाळांकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला, तर पालकांनीसुद्धा पाल्यास पेढा भरवून आनंद व्यक्त केला. यंदा कोरोनाने दहावीच्या विद्यार्थ्यांवर वर्षभर कृपा केली होती. कोरोनामुळे शाळाच भरली नाही, तर परीक्षासुद्धा रद्द झाली. अखेर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे त्यातून दिसून आले.