संपत साळुंखेवरील कारवाईचा मध्य रेल्वेच्या टीसींकडून निषेध
By Admin | Updated: May 30, 2014 13:20 IST2014-05-30T00:12:12+5:302014-05-30T13:20:14+5:30
जळगाव स्थानकावर घडलेल्या घटनेची पुरेशी माहिती न घेता तिकिट तपासनीस संपत सांळुखेला मारहाण केल्याचा दावा करत मुंबईतील मध्य रेल्वेच्या टीसींनी मारहाणीचा निषेध केला आहे.

संपत साळुंखेवरील कारवाईचा मध्य रेल्वेच्या टीसींकडून निषेध
मुंबई : जळगाव स्थानकावर घडलेल्या घटनेची पुरेशी माहिती न घेता तिकिट तपासनीस संपत सांळुखेला मारहाण केल्याचा दावा करत मुंबईतील मध्य रेल्वेच्या टीसींनी मारहाणीचा निषेध केला आहे.
जळगाव स्थानकातील त्या घटनेत संबंधित तिकिट तपासनीस संपत साळुंखे त्या महिलेची मदत करीत होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही दुदैवी घटना घडली. मात्र त्या घटनेची पुरेशी माहिती न घेता संपत साळुंखे या कर्तव्यदक्ष टीसीला प्रवाशांनी वेठीस धरल्याचे टीसींचे म्हणणे आहे.
संपत हे गेली ३८ वर्ष रेल्वे प्रशासनाच्या सेवेत आहे. या कार्यकाळात त्याच्याविरूद्ध एकही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. शिवाय, संपतला सर्वोत्कृष्ट कुस्तीवीर म्हणून शासनाकडून अर्जुन पुरस्कार, महाराष्ट्र केसरी, छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे तिकिट तपासणीसांसोबत वारंवार घडणार्या अशा घटनांबाबत मध्य रेल्वे प्रशासनाच्या तिकिट तपासनीसांनी संताप व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)