मध्य रेल्वेच्या ‘सीओएम’कडून पाहणी
By Admin | Updated: May 31, 2017 16:08 IST2017-05-31T16:08:22+5:302017-05-31T16:08:22+5:30
एक्स्प्रेस गाडीने त्यांनी इंजिनमध्ये बसून भुसावळ ते खंडवा या सेक्शनचे फूट प्लेट निरीक्षण केले

मध्य रेल्वेच्या ‘सीओएम’कडून पाहणी
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जळगाव, दि. 31 - मध्य रेल्वेचे मुख्य परीचालन व्यवस्थापक (सीओएम) ए. के.जैन यांनी 31 मे रोजी भुसावळ-खंडवा या सेक्शनमध्ये ‘फूट प्लेट निरीक्षण’ केले. त्यांचे आज 11093 कामायनी एक्स्प्रेसने सकाळी आगमन झाले. याच एक्स्प्रेस गाडीने त्यांनी इंजिनमध्ये बसून भुसावळ ते खंडवा या सेक्शनचे फूट प्लेट निरीक्षण केले. नियमित गती, वळणार गाडीची गती, तांत्रिक समस्या, लोको पायलट यांची समस्या आदींचे निरीक्षण त्यांनी केले या शिवाय भुसावळ -खंडवा या सेक्शनमधील रेल्वे स्थानकांची माहिती घेतली. त्यांच्या सोबत भुसावळचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक नरपतसिंग उपस्थित होते. प्रारंभी ए. के. जैन यांचे भुसावळ रेल्वे स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक आर. के. कुठार यांनी स्वागत केले. निरीक्षण केल्यानंतर ते पुढे जबलपूर येथे रवाना झाले.