जळगाव : जळगाव जिल्हयात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्तकालीन व्यवस्था म्हणून भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे रूग्णालयात ८ आयसीयु बेडसहीत एकूण ६४ बेड राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे़ या बेडची व्यवस्था ही केवळ कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्ती, रुग्ण यांचेकरीता असेल. रूग्णालयामध्ये आवश्यक असणाऱ्या मेडीकल स्टाफच्या उपलब्धतेसाठी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतही सूचविण्यात आले आहे.
भुसावळ येथील मध्य रेल्वेचे रूग्णालयत डेडिकेटेड कोविड रूग्णालय म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:24 IST