शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम बंद, ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 2:34 PM

खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम बंद पडले आहे. ते सुरू करण्याची मागणी होत आहे.

सावखेडा : रावेर तालुक्यातील खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम ब-याच महिन्यांपासून बंद असल्याने हजारो खातेदार एटीएम सेवेपासून वंचित आहेत. कित्येक महिन्यांपासून बंद असलेले एटीएम सुरू न झाल्याने खातेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  किमान बँकेच्या वेळेत तरी एटीएम सुरू करावे, अशी खातेदारांकडून मागणी करण्यात येत आहे.खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना सात-आठ महिन्यांपूर्वी घडली होती. सावखेडा, खिरोदा, रोझोदा, कोचूर, कळमोदा, जानोरी, चिंचाटी, तिड्या मोहमांडली, अंधारमळी परिसरातील हजारो नागरिकांचे खाते या बँकेत आहे. लाखो रुपयांचा व्यवहार दररोज बँकेतून होत असतो. बँकेतील खातेदारांची संख्या पाहता बँकेची सध्याची जागादेखील अपूर्ण पडते.        बँकेच्या एटीएमची चोरट्यांनी तोडफोड केल्यापासून  हे एटीएम बंदच आहे. खातेदार एटीएमच्या सेवेपासून वंचित आहे. एटीएमबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे याविषयी चौकशी केली असता या ठिकाणचे एटीएम जमा करून संबंधित खासगी एजन्सीचे  एटीएम रद्द करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. एट एमची सुविधा असूनदेखील त्याचा लाभ घेता येत नसल्याने खातेदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एटीएम बंद असल्याने बँकेतील कर्मचारी वर्गावरदेखील त्याचा खूप ताण पडतो. किमान बँकेच्या वेळेत तरी एटीएम सुरू करण्यात यावे, अशी खातेदारांकडून मागणी होत आहे.

मागील काही महिन्याअगोदर सेंट्रल बँक खिरोदा येथील एटीएम फोडण्यात आले होते. यापूर्वीही एक-दोन वेळा एटीएम फोडण्यात आले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील एटीएम जमा करून घेतले आहेत व या ठिकाणचे एटीएम रद्द करण्यात आले आहे. -हितेश बालतांडे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खिरोदा

सेंट्रल बँक खिरोदा येथील एटीएम सात आठ महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील ग्राहकांचे पैसे काढण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. त्यांना वेळोवेळी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यात वयोवृद्ध तसेच शेतकरी, विद्यार्थी यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ पातळीवरून  या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एटीएम सुरू करण्यात यावे. जनतेला न्याय द्यावा.-किरण पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर  संघ, रावेर

सेंट्रल बँक ऑफ इंडिया खिरोदा एटीएमला सिक्युरिटी गार्ड द्यायला तयार नाही.  आमच्या करारामध्ये सिक्युरिटी गार्डचे कोणतेही प्रयोजन नाही. आम्ही खिरोदा येथील सेंट्रल बँक एटीएम फुटले तेव्हा एटीएम जमा करून घेतले आहे  व आम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.-दीपक तिवारी, प्रायव्हेट एजन्सी चैनल मॅनेजर

टॅग्स :bankबँकRaverरावेर