सावखेडा येथे स्मशानभूमीचा कोसळला स्लॅब
By Admin | Updated: July 3, 2017 13:30 IST2017-07-03T13:30:01+5:302017-07-03T13:30:01+5:30
सावखेडा येथील स्मशान भूमीचा स्लॅब 2 रोजी सायंकाळी अचानक कोसळला.

सावखेडा येथे स्मशानभूमीचा कोसळला स्लॅब
ऑनलाईन लोकमत
वरखेडी ता. पाचोरा, दि.3 : सावखेडा येथील स्मशान भूमीचा स्लॅब 2 रोजी सायंकाळी अचानक कोसळला. सुदैवाने या ठिकाणी कुणीही उपस्थित नसल्याने जिवितहानी झाली नाही.
सावखेडा बद्रुक व व सावखेडा खुर्द या दोन गावांची संयुक्त स्मशानभूमी सावखेडा - वरखेडी रस्त्यावर आहे. 15 वषार्पूर्वी या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून स्मशानभूमीचा ढाचा कमकुवत झालेला होता. त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी जीव मुठीत घेऊन सोपस्कार उरकले जायचे. 2 रोजी परिसरात झालेल्या पावसामुळे आत पाणी मुरून संपूर्ण स्लॅब कोसळला. दोनच दिवसांपूर्वी सावखेडा बुद्रुक येथील भैरवनाथ देवस्थान येथे भक्त निवासाच्या बांधकाम भूमिपुजानाच्यावेळी दोन्ही गावाच्या सरपंच व ग्राम पंचायत पदाधिका:यानी या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाची मागणी केली होती.