शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

जळगावात रेल्वे रुळावर ठेवले सिमेंटचे ब्लॉक, गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 12:46 IST

घातपाताचा प्रयत्न

ठळक मुद्देकोल्हे हिल्स परिसरातील घटनाइंजिन बदलले, ४० मिनिटे खोळंबा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - मुंबई येथून बिहारकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसचा घातपात घडविण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी उघड झाल्याने खळबळ उडाली. कोल्हे हिल्स परिसरात रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. भरधाव वेगाने आलेल्या या गाडीच्या धडकेत ब्लॉकचे तुकडे झाले तर इंजिनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाचे प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला.दुसरे इंजिन मागविलेया घटनेमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने जळगाव स्थानकावरुन दुसरे इंजिन मागविले व गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी रेल्वेच्या अधिकाºयांनी तालुका पोलीस स्टेशन गाठून अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दिली. घातपात किंवा अपघात घडविण्याच्या दृष्टीने रेल्वे रुळावर दगड ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आरक्षित बोगीतून धूर निघाल्याने सचखंड एक्सप्रेसचा खोळंबारेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक ठेवल्याच्या घटनेच्या आधी अमृतसर-नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या (क्र.१२७१६) एस-५ या आरक्षित बोगीत अचानक धूर निघाल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. रविवारी दुपारी साडे चार वाजता गाळण स्थानकाजवळ हा प्रकार घडला. यावेळी प्रवाशांनीच साखळी ओढून गाडी थांबविली. या घटनेमुळे सचखंड एक्सप्रेस गाळण स्थानकाजवळ तब्बल ३५ मिनिटे थांबून होती.चालकाचे प्रसंगावधानमुंबई येथून बिहारमधील छपरा येथे जाणारी गोदान एक्सप्रेस (क्र.११०५५) भुसावळच्या दिशेने जात असताना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाºया कोल्हे हिल्स परिसरात खांब क्र.४१३ /२३ ते २५ या दरम्यान रेल्वे रुळावर कोणीतरी सिमेंटचे रेल्वेचेच दोन फुटाचे ब्लॉक ठेवले होते.गाडी भरधाव वेगाने असल्याने हा प्रकार चालकाच्या निदर्शनास उशिरा आला. त्यामुळे या ब्लॉकचे तुकडे झाले व त्याचा फटका इंजिनला बसला. त्याचा मोठा आवाज झाल्याने चालकाने नियंत्रण मिळवित गाडी थांबविली. चालकाने ही घटना लागलीच स्टेशन मास्तरला कळविली. त्यानंतर सरकारी यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली.रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, जितेंद्र पाटील, वासुदेव मराठे, पोपट सोनार यांच्यासह लोहमार्ग पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता.इंजिन बदलले, ४० मिनिटे खोळंबाघातपात किंवा अपघात होण्याच्या दृष्टीनेच हे ब्लॉक रुळावर ठेवण्यात आल्याचा संशय आहे. भरधाव वेगाच्या गाड्या अशा अपघातात रुळाच्याखाली घसरण्याचा धोका असतो. या घटनेत चालकाने नियंत्रण मिळविल्याने गाडी रुळाच्याखाली गेली नाही, परंतु इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी तब्बल ४० मिनिटे ही गाडी घटनास्थळावर थांबून होती.

 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव