नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:05+5:302021-09-05T04:22:05+5:30

जळगाव : येथील नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम पद्मावती मंगल कार्यालयात ...

Celebration of Shri Sant Sena Maharaj Punyatithi by Nabhik Samaj Vikas Mandal | नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव : येथील नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम पद्मावती मंगल कार्यालयात झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, जिल्हाध्यक्ष बंटीभाऊ नेरपगारे, कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, संचालक बापू सोनवणे, संतोष खोंडे, नारायण सोनवणे, राजकुमार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री संत सेना महाराज मंदिराविषयी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात येऊन, देणगीदारांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वितेकरिता मंडळाचे अध्यक्ष जगदीश वाघ, शहराध्यक्ष भिकन बोरसे, रामभाऊ जगताप, कमलेश निकम, नाना बोरसे, आबा बोरसे, विकास फुलपगारे, विकास बोरसे, एकनाथ सोनवणे, पंकज पवार, बस्तीराम बोरसे, संदीप वसाने, बंटी ठाकरे, मोहन पवार, बापू सोनवणे, भगवान शिवरामे, हिरामण सोनवणे, तुळशीराम जगताप, राजू वाघ, मयूर सोनवणे, सुरेश सोनगिरे, रवींद्र महाले, युवराज बोरसे, सचिन सोनवणे, किशोर वाघ, उदय पवार, शैलेश वाघ, अश्विन मोरे, दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebration of Shri Sant Sena Maharaj Punyatithi by Nabhik Samaj Vikas Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.