राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:50+5:302021-06-02T04:13:50+5:30

जळगाव : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी ...

Celebration of Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti | राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

जळगाव : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीपकुमार केदार उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कोल्हे व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी यांनी केले होते.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रा. नीलेश जोशी, मनीष वनकर, प्रा. पंकज पाटील, संजय जुमनाखे, मोहन चौधरी, नीलेश नाईक, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

==============

जागतिक तंबाखूविरोधी दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोध दिवस साजरा करून तंबाखू व्यसनमुक्त भारत जनजागृती अभियानास सुरुवात केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना, तंबाखूमुळे होणारे नुकसान तसेच यामुळे कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो, याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.

==============

फोटो : 9.06 वाजेचा मेल

मुरलीधर वाणी सेवानिवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्टेट बँकेच्या कालिकामाता शाखेतील सिनिअर असिस्टंट मुरलीधर लक्ष्मण वाणी हे ३१ मे रोजी ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांनी दाणाबाजार, मुख्य शाखा, म्हसावद शाखा आदी शाखांमध्ये देखील सेवा दिली आहे.

Web Title: Celebration of Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti