विविध शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:48+5:302021-02-05T05:53:48+5:30

संस्कृती माध्य. विद्यालयात मुख्याध्यापिका डी.सी. येवले ईश्वर पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. ऋतिका बेलदार, अंजली लोहार, सुजाता प्रसाद, ...

Celebration of Mahatma Gandhi Punyatithi and Martyr's Day in various schools | विविध शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

विविध शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

संस्कृती माध्य. विद्यालयात मुख्याध्यापिका डी.सी. येवले ईश्वर पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. ऋतिका बेलदार, अंजली लोहार, सुजाता प्रसाद, गौरंगी पाटील, रेणुका हटकर, नम्रता विसपुते या विद्यार्थ्यांनी विचार प्रकट केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी फालक यांनी केले.

छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय

छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंगला महाजन होत्या. प्रमुख पाहुणे उपशिक्षक प्रशांत चौधरी होते. यावेळी सागर भारुळे, रुक्साना तडवी, योगेश पवार, कल्पिता कोरे उपस्थित होते.

सीताबाई गणपत माध्य.विद्यालय

सीताबाई गणपत माध्य. विद्यालयात मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे यांनी प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी अनुपमा कोल्हे, सचिन महाजन, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भूषण भोळे आदी उपस्थित होते.

प्राथमिक विद्यामंदिर

निमखेडी शिवारातील प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपक भारंबे, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे यांनी परिश्रम घेतले.

रत्ना जैन प्राथमिक विद्यालय

रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका आशा निंबा साळुंखे यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच विद्यार्थ्यांना गांधीजींच्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रावसाहेब रूपचंद विद्यालय

आर.आर. विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक एन.डी. सोनवणे यांनी प्रतिमापूजन केले. संस्कृत शिक्षक द्वारकाधीश जोशी, डी.बी.पांढरे, बी.ए. पानपाटील, प्र. मुख्याध्यापक विजय रोकडे, पी.आर. श्रावगी, आर.बी. महाजन, पी.पी. रस्से, व्ही.एम. ढाके, अंजली बोरसे पाटील, भदाणे उपस्थिती होती.

Web Title: Celebration of Mahatma Gandhi Punyatithi and Martyr's Day in various schools