पाळधी येथे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 19:32 IST2018-08-26T19:31:22+5:302018-08-26T19:32:21+5:30
कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे कार्यक्रमात आवाहन

पाळधी येथे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जल्लोषात
पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : तालुका शिवसेना व युवासेना आयोजित शिवसंपर्क अभियानाची सुरुवात जामनेर तालुक्यातील पाळधी येथून करण्यात आली.
पाळधी येथील माळी समाज मंगल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीची वाट न बघता, अंग झटकून कामाला लागावे व जामनेर तालुक्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून आणून भगवा फडकवावा, असे आवाहन केले. तसेच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातून २५ हजार फॉर्म पहिल्या टप्प्यात भरून गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक उभा करणार असल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी सांगितले.
व्यासपीठावर जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, नानेश्वर महाराज जलकेकर, जिल्हा संघटक, महिला आघाडीप्रमुख उषा मराठे, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, तालुका संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ संपर्कप्रमुख शिरोडकर, जिल्हा महिला संघटक पूनम बºहाटे, डॉ.उज्ज्वला पाटील, उपजिल्हा प्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाप्रमुख पंडित जोहरे, विश्वजित पाटील, गणेश पांढरे, सुधाकर सराफ, भरत पवार, सांडू गुरव, रवी पांढरे व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.