नारणे येथे अनोख्या पद्धतीने पोळा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:20+5:302021-09-08T04:21:20+5:30

गावाचे सुपुत्र व तालुक्याचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व बैल जोड्यांची श्री खंडेराय मंदिरापासून वाजत ...

Celebrated in a unique way at Narne | नारणे येथे अनोख्या पद्धतीने पोळा उत्साहात साजरा

नारणे येथे अनोख्या पद्धतीने पोळा उत्साहात साजरा

गावाचे सुपुत्र व तालुक्याचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व बैल जोड्यांची श्री खंडेराय मंदिरापासून वाजत गाजत एकत्रितपणे रांगेने मिरवणूक काढण्यात आली. गावातील मारुती मंदिराजवळ प्रत्येक बैलजोडीधारकाचा श्रीफळ व टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर घरोघरी आकर्षकरित्या सजवलेल्या बैल जोडीचे पूजन करण्यात आले.

बैलांची रंगीबिरंगी झूल गोंडे, आरसे, फुगे घुंगरू, माळा इत्यादींनी सजावट करण्यात आली होती. या अनोख्या उपक्रमामुळे गावातील सर्व लहान थोरांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण संचारले होते. वाद्याच्या तालावर सर्वांनी मनसोक्त नृत्य करत आनंद व्यक्त केला. यशस्वीतेसाठी अनिल बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच जितेंद्र मराठे, माजी सरपंच नरेंद्र पाटील, विश्वास पाटील, गोरख चव्हाण, प्रवीण चव्हाण, महादू चव्हाण, उज्ज्वल भिल, चांगो भिल, आनंद कोळी, दिवाकर बाविस्कर, नीलेश बाविस्कर, विश्वजीत कोळी, विजय चव्हाण, बापू महाजन, गावातील सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrated in a unique way at Narne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.