शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

भुसावळात जागतिक हृदय दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 4:45 PM

स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देभुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय एम ए भुसावळ यांचा संयुक्त उपक्रमहृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी केले मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय.एम.ए. भुसावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक हृदय दिनानिमित्त रविवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरू झालेल्या रॅलीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भुसावळ रेल्वे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ.दिनेश फिरके, रनर ग्रुप अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक, डॉ.व्ही.एन.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. जनजागृती रॅलीत शहरातील डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स, रेल्वे व पोलीस विभागातील कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शेकडो आबालवृद्ध नागरिकांनी सहभाग नोंदविला.‘हृदयाची काळजी घ्या’, ‘स्वत:साठी वेळ द्या’ अशा प्रकारच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवशक्ती आर्केड जवळून वळसा घेऊन रॅली पुन्हा कार्यक्रमस्थळी दाखल झाली. रॅलीचे नेतृत्व प्रा. प्रमोद शुक्ला व पूनम भंगाळे यांनी केले तर वाहतूक नियमन मुकेश चौधरी, डॉ.निर्मल बलके, सुनील सोनगिरे यांनी केले. त्यानंतर डॉ.दीपक जावळे यांनी उपस्थितांना हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ.लीना फिरके, डॉ.संज्योत पाटील, डॉ.हर्षा फिरके, डॉ.मिलिंद धांडे यांनी एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास काय प्राथमिक उपचार करावे व हृदय सुरू करण्यासाठी काय कृती करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपेश सोनार, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गणसिंग पाटील, संजय भटकर, गोपाळ सोनवणे, नीलेश लाहोटी, नकुल असावा, अखिलेश कनोजिया ,मनोहर गायकवाड, चारुलता अजय पाटील, अजय पाटील, योगेश मांडे, बिट्टूकुमार वर्मा, हर्षल चौधरी, राहुल अग्रवाल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ