भुसावळात जागतिक हृदय दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 04:45 PM2019-09-29T16:45:11+5:302019-09-29T16:46:34+5:30

स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृती रॅली काढण्यात आली.

 Celebrate World Heart Day in Bhusawal | भुसावळात जागतिक हृदय दिन साजरा

भुसावळात जागतिक हृदय दिन साजरा

Next
ठळक मुद्देभुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय एम ए भुसावळ यांचा संयुक्त उपक्रमहृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी केले मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व आय.एम.ए. भुसावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक हृदय दिनानिमित्त रविवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरू झालेल्या रॅलीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भुसावळ रेल्वे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ.दिनेश फिरके, रनर ग्रुप अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक, डॉ.व्ही.एन.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. जनजागृती रॅलीत शहरातील डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स, रेल्वे व पोलीस विभागातील कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शेकडो आबालवृद्ध नागरिकांनी सहभाग नोंदविला.
‘हृदयाची काळजी घ्या’, ‘स्वत:साठी वेळ द्या’ अशा प्रकारच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवशक्ती आर्केड जवळून वळसा घेऊन रॅली पुन्हा कार्यक्रमस्थळी दाखल झाली. रॅलीचे नेतृत्व प्रा. प्रमोद शुक्ला व पूनम भंगाळे यांनी केले तर वाहतूक नियमन मुकेश चौधरी, डॉ.निर्मल बलके, सुनील सोनगिरे यांनी केले. त्यानंतर डॉ.दीपक जावळे यांनी उपस्थितांना हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ.लीना फिरके, डॉ.संज्योत पाटील, डॉ.हर्षा फिरके, डॉ.मिलिंद धांडे यांनी एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास काय प्राथमिक उपचार करावे व हृदय सुरू करण्यासाठी काय कृती करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपेश सोनार, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गणसिंग पाटील, संजय भटकर, गोपाळ सोनवणे, नीलेश लाहोटी, नकुल असावा, अखिलेश कनोजिया ,मनोहर गायकवाड, चारुलता अजय पाटील, अजय पाटील, योगेश मांडे, बिट्टूकुमार वर्मा, हर्षल चौधरी, राहुल अग्रवाल यांनी सहकार्य केले.

Web Title:  Celebrate World Heart Day in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.