शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:16+5:302021-09-07T04:22:16+5:30
जळगाव : शहरातील शाळांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ...

शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा
जळगाव : शहरातील शाळांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारून इतर विद्यार्थ्यांना अध्यापन केले, तर पालक - शिक्षक संघाच्यावतीने शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सेंट टेरेसा शाळेत शिक्षकांचा सत्कार (फोटो- ०६ सीटीआर ९४)
शिक्षक दिनानिमित्त सेंट टेरेसा शाळेत पालक - शिक्षक संघाच्यावतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात पालक - शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा दीपा राका, शालू छाबरा, सुनीता जाखेटे, दिशा गोग्या, ज्योती झंवर, दीपाली संघवी, सोनिया गगर, ज्योती रूणवाल आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलिएट आणि उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटील रोझ तसेच सिस्टर पवित्रा यांच्यासह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.
.........
मुंदडे माध्यमिक विद्यालय
पिंप्राळा येथील पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक डी. एस. कुमावत यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती जे. आर. बियाणी यांनी दिली. तर बी. बी. बाविस्कर यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. आर. व्ही. अंबरकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. एन. तडवी यांनी आभार मानले. याप्रसंगी आर. एस. शिरसाठ, डी. बी. हजार, एस. पी. पाटील, आर. सी. चौधरी आदींची उपस्थिती होती.
.........
भगिरथ सोमाणी विद्यालय
पिंप्राळा येथील भगिरथ सोमाणी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक वाय. व्ही. सैय्यद यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिक्षक एस. टी. जाधव, पंकज जोगी, अश्विनी महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील पाटील. के. व्ही. बारी, बी. एस. कस्तुरे आदींची उपस्थिती होती.
..........
आर. बी. पाटील विद्यालय
नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालयात योगेश पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संदीप ठोसर, माळी, अनिल, पुनम चौधरी, शीतल कदम, नीला घटक, सीमा लढ्ढा, तनुजा पाटील आदींची उपस्थिती होती. सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सोनल कपोते यांनी आभार मानले.
.........
भंगाळे माध्यमिक विद्यालय
सीताबाई गणपत भंगाळे विद्यालयात शिक्षिका विजया चौधरी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, अनुपमा कोल्हे, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, दीपक भारंबे, भूषण् भोळे, प्रशांत भारंबे, विजयकुमार नारखेडे आदींची उपस्थिती होती.
.........
किलबिल विद्यामंदिर
किलबिल बालक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत शिक्षक दिन साजरा केला. लावण्या पाटील, दुर्वा कोल्हे, सोहाली चौधरी, विलिनी चौधरी या चिमुकल्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या होत्या. यावेळी कार्यक्रमात चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी, रत्ना नेमाडे, कुंदा भारंबे, प्रतिभा जोशी आदींची उपस्थिती होती.