ऑलिम्पिक दिन साजरा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:39+5:302021-06-26T04:12:39+5:30

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा ...

Celebrate Olympic Day, honoring international athletes | ऑलिम्पिक दिन साजरा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा केला सन्मान

ऑलिम्पिक दिन साजरा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा केला सन्मान

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आला.

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, प्रीतेश पाटील, कल्पेश कोल्हे, अक्षय येवले, नेहा देशमुख, प्राची नाईक, शिवानी देशमुख, रचना म्हस्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सरवानन (सेलिंग) तेजस्विनी सावंत (रायफल शूटिंग), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटिंग १० मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्वीमिंग) हे या खेळाडूंचे छायाचित्र असलेले बॅनर लावून राष्ट्रीय खेळाडूंच्याहस्ते त्याचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, रेखा पाटील, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मीनल थोरात, भरत देशमुख, गोविंद सोनवणे, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सूरज पवार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Web Title: Celebrate Olympic Day, honoring international athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.