ट्रान्सपोर्ट नगरात वाहन चालक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:34+5:302021-09-18T04:18:34+5:30

जळगाव : ट्रान्सपोर्ट नगरात वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही आणि पोलीस निरीक्षक ...

Celebrate Driver's Day in Transport City | ट्रान्सपोर्ट नगरात वाहन चालक दिन साजरा

ट्रान्सपोर्ट नगरात वाहन चालक दिन साजरा

जळगाव : ट्रान्सपोर्ट नगरात वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही आणि पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मेढे, किरण बर्गे, राम बोरकर, मोसीम खान अयुब खान, शेख फईम, शफी पिरन, जमील खान खलील खान, शेख सिद्दीकी, युनूस शेख, विकास कोळी, जावेद पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस व ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे श्याम लोही यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नईम मेमन, साजीद सैयद, कल्पेश छेडा, राजू महेश्री, नंदू पाटील, अमोल वाघ, महेंद्र आबोटी, अशोक वाघ उपस्थित होते.

आचार्य विद्यालयात गणेश चतुर्थी साजरी

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी सुजाता पाखले, कविता पाटील, पल्लवी कुलकर्णी, हर्षदा कासार यांनी मुलांना गणेशाच्या गोष्टी सांगितल्या. तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. हर्षदा कासार यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक कल्पना बावस्कर यांनी मार्गदर्शन केले.

आंतरराज्य बारी समाज युवक - युवती परिचय पुस्तिकेसाठी आवाहन

जळगाव : संत रुपलाल महाराज सामाजिक सेवा समितीतर्फे विवाहेच्छुक युवक - युवती परिचय पुस्तिका प्रकाशित केली जणार आहे. यानिमित्त ‘पानवेली’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन दिवाळीच्या सुमारास केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विवाहेच्छुक बारी समाजातील युवक - युवतींची माहिती फोटोंसह ३० सप्टेंबरपर्यंत अवधूत कोल्हे यांच्याकडे द्यावी, असे आवाहन शिवलाल बारी यांनी केले आहे. ही परिचय नोंदणी विनामूल्य केली जाणार आहे.

Web Title: Celebrate Driver's Day in Transport City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.