शहरात ९८ ठिकाणी बसविण्यात येतील सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:21+5:302021-02-05T06:01:21+5:30
सहा सदस्यीय समिती गठीत : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यालगत होणारे अपघात, अतिक्रमणाची समस्या, लहान-मोठ्या चोऱ्यांचे ...

शहरात ९८ ठिकाणी बसविण्यात येतील सीसीटीव्ही
सहा सदस्यीय समिती गठीत :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यालगत होणारे अपघात, अतिक्रमणाची समस्या, लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण यावर आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांसह चौक व अन्य ९८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी स्थानिक संनिरीक्षण प्रकल्पांकरिता सहा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदेश काढले आहेत.
शासनाच्या गृह विभागाकडून प्रत्येक शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश काढण्यात आले होते. या आदेशानुसाच शहरात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शहरातील अतिसंवेदनशील भागासह शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर, प्रमुख मार्केट, उद्यान परिसरात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त समितीत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील व जि.प.तील एकेक कर्मचाऱ्याचा समावेश आहे.