डॉक्टर मारहाण व आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेज जप्त
By Admin | Updated: March 19, 2017 00:31 IST2017-03-19T00:31:39+5:302017-03-19T00:31:39+5:30
डॉ़ रोहन म्हामुनकर यांना मारहाण प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान शनिवारी गुन्हे अन्वेषण विभागाने शहर पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेजची हार्डडिस्क पंचनामा करून जप्त केली.

डॉक्टर मारहाण व आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेज जप्त
धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ़ रोहन म्हामुनकर यांना मारहाण प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान शनिवारी गुन्हे अन्वेषण विभागाने शहर पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेजची हार्डडिस्क पंचनामा करून जप्त केली.
डॉ़ म्हामुनकर यांना मारहाणप्रकरणी शहर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती़ त्यापैकी प्रदीप सदाशिव वेताळ (वय २१, रा़ चक्करबर्डी) याने १४ रोजी दुपारी कोठडीतील स्वच्छतागृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती़ त्यानंतर या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता़ सोमवारी सीआयडीकडून दोन पोलीस अधिकाºयांचे जबाब नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे़ दरम्यान, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग हे शहर पोलीस ठाण्याला शनिवारी दुपारी भेट देणार होते, मात्र त्यांनी भेट दिली नाही़