धरणगाव शहरावर सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर

By Admin | Updated: December 29, 2015 00:28 IST2015-12-29T00:28:42+5:302015-12-29T00:28:42+5:30

पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे धरणगाव शहरात पहिल्याच टप्प्यात 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़

CCTV cameras at Dharanagaan city: | धरणगाव शहरावर सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर

धरणगाव शहरावर सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर

धरणगाव : पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे धरणगाव शहरात पहिल्याच टप्प्यात 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ लोकसहभागातून असा अभिनव उपक्रम राबविणारी धरणावची क वर्ग ऩपा. राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आह़े

शहरातील अत्यंत महत्त्वाची आणि वर्दळीची प्रमुख ठिकाणे या कॅमे:यात कैद झाली असून येथील प्रत्येक हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आह़े धरणगाव शहर ग्रामस्थांच्या दृष्टीने चांगले शहर असले तरी प्रशासनाच्या दृष्टीने त्यास संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. अनेकदा छोटय़ा-छोटय़ा कारणांवरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण होत़े

सहायक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सीसीटीव्ही बसविण्याबाबत चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली़ त्यांच्या सहमतीनंतर हा उपक्रम शहरात राबवायचाच असा चंग गणेश कदम यांनी बांधला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

नगरपालिकेने दिले दोन लाख 45 हजार रुपये

या उपक्रमाबाबत गणेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सचिन बेंद्रे, भगवान उमाडे, दीपक माळी, हकीम शेख, शब्बीर पवन आदींनी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, मुख्याधिकारी सपना वसावा, न.पा. गटनेते दीपक वाघमारे व नगरसेवकांची भेट घेतली आणि या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पालिकेने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला त्यांनी सकारात्मकता दर्शवत नगरपालिकेकडून दोन लाख 45 हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

उत्स्फूर्त लोकसहभाग

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस व पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिष्ठित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ज्ञानेश्वर महाजन, सुनील चौधरी, गोविंद कंखरे, मधुकर रोकडे, छोटू धनगर, दीपक नगरिया, मुश्ताक बोहरी, ईश्वर सोनार, सराफ असोसिएशन, बालाजी पतसंस्था, यशवंत अर्बन पतसंस्था, गुरुदत्त नागरी पतसंस्था, व्यंकटेश पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, हिंगलाज माता पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था, आनंद पब्लिकेशन, श्री जी जिनिंग, एन.बी. कॉटन, महावीर फायबर्स, दुर्गेश जिनिंग, कमल जिनिंग, दीपक वाघमारे आदींनी त्यासाठी आर्थिक योगदान दिल़े, तर खर्दे येथील सुनील पाटील यांनी 40 इंची टीव्ही सेट पोलीस स्टेशनला या उपक्रमासाठी भेट दिला़ (वार्ताहर)

Web Title: CCTV cameras at Dharanagaan city:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.