सीसीआय यावर्षी करणार १ कोटी कापूस गाठींची खरेदी - डॉ.पी.अली. राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:28 PM2019-09-24T12:28:35+5:302019-09-24T12:29:01+5:30

कापसाच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत १२० रुपयांची वाढ : जळगावला ८ खरेदी कें द्रे

CCI to buy 2 crore cotton bales this year - Dr Ali Queen | सीसीआय यावर्षी करणार १ कोटी कापूस गाठींची खरेदी - डॉ.पी.अली. राणी

सीसीआय यावर्षी करणार १ कोटी कापूस गाठींची खरेदी - डॉ.पी.अली. राणी

googlenewsNext

अजय पाटील
जळगाव : यंदा कापूस उद्योगावर मंदी असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मालाला खरेदीदार मिळण्यासाठी सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कटीबध्द असून, यावर्षी सीसीआय देशभरात १ कोटी गाठींची खरेदी करणार असल्याची माहिती सीसीआयच्या अध्यक्षा डॉ.पी.अली राणी यांनी दिली.
सोमवारी खान्देश जिनींग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशनतर्फे जैन हिल्सवर कापूस विषयावरील महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्या बोलत होत्या. या संमेलनाला कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा, माजी विधानसभा अध्यक्ष व उद्योजक अरुणभाई गुजराथी, महाराष्टÑ जिन प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भुपेंद्रसिंग राजपाल, अरविंद जैन, पंकज मेपाणी, अशोक डागा व खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन हे उपस्थित होते.
अमेरिका-चायना ट्रेडवॉरचा परिणाम वर्षभर
कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा म्हणाले की, यंदा कापसाचा हंगाम गेल्या वर्षापेक्षा चांगला राहण्याची शक्यता आहे. मात्र, स्पिनिंग उद्योगातील मंदी, अमेरिका व चीनमधील ट्रेडवॉर अशा कारणांमुळे निर्यातीत घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. यंदा निर्यातमध्ये घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ४६ लाख गाठी निर्यात झाल्या होत्या. मात्र, यंदा २० ते २५ लाख गाठींच निर्यात होणार आहेत.
ट्रेड वॉरमुळे अमेरिकेच्या कापसावर परिणाम झाला आहे. तसेच भारतातील कापसाला भारतातील स्पिनींग उद्योगातील उद्योजक खरेदी करत नसून, अमेरिका किंवा इतर देशातील कापूस भारतातील स्पिनींग उद्योजक खरेदी करत आहेत. या कापसावर जर शासनाने डपींग ड्युटी लावली तर या कापसाऐवजी भारतातील कापसाला स्पिनींग उद्योजक पसंती देतील अशीही माहिती अतुल गणत्रा यांनी दिली.
एरंडोल, पाचोºयासह आठ ठिकाणी होणार खरेदी
जिल्ह्यात सीसीआयचे ८ केंद्र सुरु होणार असून, यामध्ये आव्हाणे, एरंडोल, पाचोरा, जामनेर, भुसावळ, शेंदुर्णी, पहूर व बोदवडचा समावेश आहे. या कार्यक्रमात प्रगतीशिल शेतकऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. शेवटच्या सत्रात जिनींग उद्योगासमोरील अडचणी या विषयावर चर्चा झाली.
दर्जानुसार खरेदी करणार
डॉ.राणी यांनी सांगितले की, सीसीआयकडून १ आॅक्टोबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. यंदा शासनाने कापसाला ५५५० रुपये क्विंटलचा हमीभाव निश्चित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच माल खरेदी करताना कापसाची गुणवत्ता पाहूनच खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा सीसीआय १ कोटी गठाण खरेदी करणार असून, हमीभावानुसार जरी जिनर्स खरेदी करणार नसले तरी सीसीआय जास्त माल खरेदी करणार असल्याने शेतकºयांना मंदीचा परिणाम होवू देणार नाही असेही डॉ.राणी यांनी सांगितले.

Web Title: CCI to buy 2 crore cotton bales this year - Dr Ali Queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव