बबलू नवले हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

By Admin | Updated: May 11, 2017 17:17 IST2017-05-11T17:17:52+5:302017-05-11T17:17:52+5:30

कंजरभाट समाजातर्फे मूकमोर्चा काढत जिल्हाधिका:यांना दिले निवेदन

CBI probe into Babloo Navle murder case | बबलू नवले हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

बबलू नवले हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

 जळगाव,दि.11- येथील रहिवासी बबलू सुभाष नवले या तरूणाची इचलकरंजी येथे हत्या झाली होती़ या निषेधार्थ कंजरभाट समाजातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ 

या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी, मारेक:यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच सरकारी वकील म्हणून खटल्यात अॅड़उज्‍जवल निकम यांची नियुक्ती करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना देण्यात आल़े
कंजरवाडा भागातील अंधशाळेपासून मूकमोर्चाला सुरुवात झाली़ पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला़ येथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आल़े 

Web Title: CBI probe into Babloo Navle murder case