Caught seven people gambling | जुगार खेळताना सात जणांना पकडले

जुगार खेळताना सात जणांना पकडले

सावदा, ता. रावेर : मस्कावद - वाघोदा बुद्रुक रस्त्यावर ३१ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेतात जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी पकडले.
पोलीस नाईक तुषार जोशी यांच्या फियार्दीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धनराज शांताराम तायडे, दीपक पांडुरंग तायडे, महेंद्र हरी पाटील, उमेश यशवंत चौधरी, प्रशांत एकनाथ पाटील, प्रदीप भास्कर पाटील, किशोर तुकाराम चौधरी सर्व राहणार मस्कावद हे जुगार खेळताना आढळले होते.
यावेळी रोख २६ हजार ५०० रुपये व ६६० रुपयांचा सामान तसेच एक लाख ५७ हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली, २० हजार ८८० रुपयाचे मोबाईल तसेच टँगो कंपनीच्या दारूच्या चाळीस बाटल्या मिळून आल्या.
नितीन रामलाल भोगे यांच्या पत्री शेडच्या आडोशाला सार्वजनिक हे आरोपी पत्ते खेळत होते व गैरकायदा दारुसह आढळले. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघनही केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी हे करीत आहे

Web Title: Caught seven people gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.