कॅशियरनेच महिला ग्राहकास चार लाखात ठगविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:49+5:302021-08-13T04:21:49+5:30
चोपडा : महिला ग्राहकाच्या खात्यातून चार लाख १५ हजार रुपये कॅशियरनेच काढून घेतल्याचा प्रकार चोपडा एचडीएफसी ...

कॅशियरनेच महिला ग्राहकास चार लाखात ठगविले
चोपडा : महिला ग्राहकाच्या खात्यातून चार लाख १५ हजार रुपये कॅशियरनेच काढून घेतल्याचा प्रकार चोपडा एचडीएफसी बँक शाखेत घडला. याप्रकरणी कॅशियर जयेश संतोष बडगुजर (रा. शेतपुरा) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा कमलेश शहा (रा. गुजराथी गल्ली) यांचे भाई कोतवाल रोडवरील एचडीएफसी बँक शाखेत खाते आहे. कॅशियर जयेश बडगुजर याने हर्षदा यांचा विश्वास संपादन करून त्यांचे एटीएम कार्ड बंद करण्यासाठी ताब्यात घेतले आणि त्यांच्या बँक खात्यातून जवळपास ३ लाख ६५ हजार एवढी रक्कम व भरणा करण्यासाठी दिलेल्या १ लाख ५० हजार या रकमेमधून ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख १५ हजार रुपये काढून घेतले.
याप्रकरणी बडगुजर याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४२०, ४०६ व ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र सदाशिव सोनवणे हे करीत आहेत.