शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली २ लाख ७ हजारांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 17:43 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सोमवारी सकाळी साडेदहाला भुसावळहून सावद्याकडे जाणाºया कारची झडती घेतली. वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्यापारी मुकेश भगवानदास लेखवाणी यांच्याजवळ दोन लाख सात हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम आढळली.

ठळक मुद्देरावेर येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली २ लाख ७ हजारांची रोकडविदेशी मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यापाठोपाठ दोन लाख रुपये जप्त करण्याच्या कारवाईने खळबळरक्कम जप्त करून रावेर कोषागार कार्यालयात जमा

रावेर, जि.जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सोमवारी सकाळी साडेदहाला भुसावळहून सावद्याकडे जाणाºया कारची झडती घेतली. वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्यापारी मुकेश भगवानदास लेखवाणी यांच्याजवळ दोन लाख सात हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम आढळली. ही रक्कम जप्त करून रावेर कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. विदेशी मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यापाठोपाठ दोन लाख रुपये जप्त करण्याचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या कारवाईमुळे सर्वत्र धाबे दणाणले आहे.भुसावळ तापी नदी पुलाजवळील अकलूद नाका क्रमांक तीनवर रावेर लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता कक्षांतर्गत नियुक्त केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाला वाहन तपासणी मोहीमेत भुसावळहून सावद्याकडे जाणारे केळी व्यापारी मुकेश भगवानदास लेखवाणी यांच्या वाहनाची (एमएच-१९-सीएफ -१२६६) झडती घेताना ५०० रू व १०० रू चलनी नोटांची दोन लाख सात हजार ७०० रूपयांची रोकड आढळली. ही रक्कम केळी मजुरांची मजुरी असल्याचा खुलासा संबंधित केळी व्यापारी मुकेश लेखवानी यांनी केला. आदर्श आचारसंहितेचे निर्लेप व निरपेक्षपणे पालन करताना ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे. यामुळे संबंधित स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख रमाकांत एकनाथ चौधरी, पोकॉ किरण चाटे, उमेश सानप, विलास झांबरे, योगेश जावळे व एन.पी. वैराळकर यांनी ही रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई केली.सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ही रक्कम रावेर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केली. ही जप्त केलेली रक्कम बंद लिफाफ्यात सिलबंद करून रावेर कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख संजय तायडे, प्रवीण पाटील, अतुल कापडे यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaverरावेर