अत्याचार प्रकरणी शालक, मेहुण्यास अटक
By Admin | Updated: January 3, 2017 17:16 IST2017-01-03T17:16:51+5:302017-01-03T17:16:51+5:30
अकलूद ता़यावल शिवारात मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याप्रकरणी नात्याने शालक, मेहुणा असलेल्या दोघा आरोपींच्या

अत्याचार प्रकरणी शालक, मेहुण्यास अटक
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 3 - अकलूद ता़यावल शिवारात मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याप्रकरणी नात्याने शालक, मेहुणा असलेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या़
किरण वसंत कोळी (अकलूद, ता़यावल) व वासुदेव नारायण तायडे (रायपूर, ता़रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोळी याचा वासुदेव तायडे हा नात्याने मेहुणा आहे़
१ रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ येथील तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला आली असताना आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला होता़ आरोपींनी मोबाईलसह रोकड हिसकावल्याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक धारबडे, नारायण सोनवणे, मनोहर देशमुख, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रवींद्र एसग़ायकवाड, योगेश पाटील, रामकृष्ण पाटील, दिलीप येवले, सतीश हाळणोर, अशोक चौधरी, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, सुशील पाटील, जयंत चौधरी, इद्रीस पठाण, बबन तडवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़,असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या ताब्यातून लांबवलेल्या मोबाईलसह एअरगनदेखील जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत.अटकेतील आरोपींनी यापूर्वी या भागात अनेक तरुण-तरुणींना गंडवले असल्याची शक्यता आहे मात्र पोलीस कोठडीतील तपासात ही बाब उघड होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.