शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कोविड सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तातडीने शासकीय यंत्रणेकडे तपासणीकरीता पाठवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:03 PM

जळगाव - जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने शासकीय यंत्रणेकडे तपासणीकरीता ...

जळगाव - जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने शासकीय यंत्रणेकडे तपासणीकरीता पाठवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी खाजगी सर्वसाधारण वैद्यकीय व्यावसायिकांना केले आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील अनेक रुग्ण हे खाजगी सर्वसाधारण व्यावसायिकांकडे जावून तपासणी करुन घेतलेले आढळून आले आहे. असे रुग्ण तपासणी करुन पुन्हा आपल्या कुटूंबात जातात. त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांच्यापासून कुटूंबातील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तातडीने शासकीय यंत्रणेकडे पाठवावे. जिल्ह्यातील अनेक खाजगी व्यावसायिक सध्या असे रुग्ण पाठवित आहे. परंतु अजूनही काही व्यावसायिक रुग्णांना पाठवित नसल्याने संसर्ग वाढत असल्याचेही  राऊत म्हणाले.जिल्ह्यात आपण सर्वच सध्या कोरोना विषाणूचा मुकाबला करीत आहोत त्यानुषंगाने माझी समस्त जळगावकरांना विनंती आहे की, स्वातंत्र्य दिन साजरा करताना कुठल्याही ठिकाणी गर्दी न करता अतिशय साध्या पद्धतीने आपण साजरा करूया त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे सर्व सण-उत्सव आहेत ते सुद्धा आपण अतिशय साधेपणाने जे आपण गेल्या चार महिन्यांमध्ये करत आलेलो आहेत तसेच अतिशय साध्यापणाने कुठलीही प्रकारची भपकेबाजी न करता आणि त्यातून कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या अथवा समाजाचे एकूण स्वास्थाला हानी पोहोचणार नाही, या पद्धतीने साजरे करूया.आपल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा वाढताना जरी दिसत असला जरी आतापर्यंतच्या बाधित 16 हजार रुग्णांमध्ये ऍक्टिव्ह केसेस ह्या फक्त चार हजाराच्या आसपास आहेत. त्यातील साडेअकरा हजार लोकांना आपण डिस्चार्ज दिला असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेणाऱ्या चार हजारपैकी दहा टक्के लोकांना ऑक्सिजन अथवा आयसीयुची आवश्यकता आहेत. इतर 90% म्हणजेच साडेतीन हजारांच्या अधिक रुग्ण हे सर्व चांगल्या स्थितीत आहेत. त्यांना कोणतीही अडचण नाही. ते कोविड केअर सेंटर अथवा होम क्वारंटाईन मध्ये आहेत. त्यामुळे रोज पेशंटची संख्या जरी वाढत असली आपल्याकडील जी फॅसिलिटी उपलब्ध आहे त्यावर याचा परिणाम होत नाही. आपल्याकडे मोठ्या प्रामणात बेड उपलब्ध आहे. याबाबतीत आपण स्वयंपूर्ण आहेत.आपण जनरल प्रॅक्टिशनरकडून किंवा मेडिकल शॉप ओनरकडून माहिती घेत आहोत त्याचा रुग्ण शोधण्यासाठी खूप फायदा होत आहे. यामुळे लवकर आपल्याला रुग्ण शोधता येत आहेत. तसेच काल पाचशे एकातर पेशंट पॉझिटिव्ह आले. त्यापैकी फक्त 41 जणांना हॉस्पिटल ॲडमिशनची गरज पडली इतर 530 हे होम क्वांरटाईनआहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव