मारहाण केल्याप्रकरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:29+5:302021-07-07T04:19:29+5:30

चाळीसगाव : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई चाळीसगाव : शहरातील रिंगरोडवरील दत्तवाडीत असलेल्या नीलेश भास्कर साळुंखे यांच्या दुकानातून घुसून त्यांना मारहाण ...

In the case of beating | मारहाण केल्याप्रकरणी

मारहाण केल्याप्रकरणी

चाळीसगाव : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

चाळीसगाव : शहरातील रिंगरोडवरील दत्तवाडीत असलेल्या नीलेश भास्कर साळुंखे यांच्या दुकानातून घुसून त्यांना मारहाण केली व दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत, चेन चोरून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अकोल दादू खाटीक, अल्ताफ अकील खाटीक, तौसीफ शकील खाटीक, मुस्ताफ लतीफ खाटीक, खलील शब्बीर खाटीक (सर्व रा. खाटीक गल्ली, चाळीसगाव ) अशी यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना २३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता घडली.

फिर्यादीचे रिंगरोडवर पंक्चर व गाड्या वॉशिंगचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच आरोपींचे भंगार विक्रीचे दुकान आहे. २३ रोजी नीलेश साळुंखे हे बाहेर गेले असताना आरोपींनी त्यांच्या भंगार दुकानातील काचेच्या बाटल्या फोडून नीलेश यांच्या दुकानासमोर टाकल्या होत्या. बाहेरून आल्यानंतर त्याची विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. नंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत असताना घटनास्थळी शीतल साळुंखे सोडविण्यास आली असता, तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, चेन आरोपींनी काढून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे साळुंखे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार वरील पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.

Web Title: In the case of beating